न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ६ मार्च २०२०) :- कायदा सुव्यवस्थेचे रक्षण करताना, गुन्ह्यांचा तपास, आंदोलने, मोर्चे, व्हीआयपींचे दौरे, गस्त यामुळे पोलिसांना जास्त वेळ कर्तव्य बजवावे लागते. या कारणाने त्यांना स्वत:च्या आरोग्याची काळजी घेता येत नाही. ही बाब लक्षात घेऊन भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय अंतर्गत सर्व पोलिस अधिकारी, कर्मचारी आणि त्यांच्या कुटूंबियांसाठी मोफत महाआरोग्य तपसाणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये मोठ्या उत्स्फूर्तपणे पोलिसांनी सहभाग घेऊल आरोग्य तपासणी केली.
या महाआरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन सिल्वर स्पोर्टस क्लब, सिल्वर ग्रुप इरसेड संस्था, डॉ. संतोष बारणे मित्र परिवार, रेड स्वास्तिक सोसायटी पुणे व राकेशभाऊ गायकवाड मित्र परिवार यांच्यावतीने कऱण्यात आले होते.
या शिबिराप्रसंगी उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते डॉ. संतोष बारणे, इरसेड संस्था कार्यकारी संचालक प्रथमेश कुलकर्णी, रेड स्वास्तिक सोसायटी संचालक पुणे विजय बोत्रे, रेड स्वास्तिक सोसायटी संचालक, शहाजी बारणे यांच्यासह इतर पोलिस अधिकारी तसेच इथर संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.
या शिबिरामध्ये किडनीचे आजार, ह्रदयाची अँजिओप्लास्टी,बायपास शस्त्रक्रिया, थॉयरॉईड, बहिरेपणा, आतड्यांचे आजार, मणका, अन्ननलिका अशा विविध आजारांच्या शस्त्रक्रिया व उपचार करण्यात आले. या आजारांबाबत तज्ज्ञ डॉक्टरांकडून सल्ले देण्यात आले. यावेळी अनेकांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले.












