न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ मार्च २०२०) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेने येस बँकेतील ‘ट्रान्झॅक्शन’ गुरुवारी रात्री १२ वाजल्यापासून थांबवले आहे. आता बँक ऑफ बडोदामध्ये मालमत्ताकर, पाणीपट्टी, बांधकाम परवानगीतून येणा-या दैनंदिन उत्पन्नाचा भरणा करण्यास सुरुवात केली आहे.
महापालिकेकडून मालमत्ता कर, पाणीपट्टी वसूल केली जाते. तसेच बांधकाम परवानगीतून देखील दररोज उत्पन्न मिळते. जास्त व्याजदर मिळत असल्याने महापालिकेने येस बँकेत ऑगस्ट २०१८ साली बचत खाते उघडले. तेव्हापासून महापालिकेने दैनंदिन वसूल झालेल्या पैशांचा येस बँकेत भरणा करण्यास सुरुवात केली. १८ महिन्याच्या काळात महापालिकेला १५० कोटी रुपयांचे व्याज मिळाले आहे.
भारतीय रिझर्व्ह बँक, येस बँकेच्या प्रशासनाला पत्र देण्यात आले आहे. वेतन, ठेकेदाराला देण्यासाठी पैसे लागणार आहेत. त्यामुळे महापालिकेचे पैसे देण्याची मागणी पत्राद्वारे करण्यात आली आहे.













