न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२. मार्च. २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरामध्ये सार्वजनिक ठिकाणी थुकण्यास बंदी असल्याबाबत तसेच सदरचे कृत्य घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६ नुसार दंडास पात्र असल्याबाबत सूचित करण्यात आलेले आहे.
त्यानुसार आज (दि. १२ / ०३ / २०२०) रोजी पिंपरी चिंचवड शहरामध्ये राबविण्यात आलेल्या कारवाईमध्ये महानगरपालिकेच्या ८ क्षेत्रीय कार्यालयांमार्फत सार्वजनिक ठिकाणी थुकणा-या व्यक्तींविरुध्द र. रु. १५० / प्रतिव्यक्ती यानुसार एकूण ४६ व्यक्तींवर कारवाई करण्यात आलेली आहे.
त्यानुसार एकूण र. रु. ६, ९०० / इतका दंड वसुल करण्यात आलेला आहे. सदरची कारवाई यापुढेही सुरु ठेवण्यात येणार असून नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी धुंकू नये, असे आवाहन महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के अनिल रॉय यांनी केले आहे.















