न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ मार्च २०२०) :- रावेत येथील अशुद्ध जल उपसा केंद्राचा विद्युत पुरवठा खंडित झाल्याने त्या कालावधीत पाण्याचा उपसा न झाल्यामुळे शहरातील सकाळचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे.
त्यामुळे आज संध्याकाळचा तसेच उद्याचाही पाणी पुरवठा विस्कळीत राहणार आहे. तरी, नागरिकांनी याची नोंद घेऊन उपलब्ध पाणी जपून वापरून महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन पाणी पुरवठा विभागाचे सहशहर अभियंता यांनी केले आहे.















