पिंपरी – चिंचवड शहर मध्यवर्ती कार्यालयामध्ये शिवसेना शहर कार्यकारीनीच्या वतीने नवनिर्वाचीत शिवसेना जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे यांचा सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी शहरप्रमुख- योगेश बाबर, शहर संघटिका-सुलभा उबाळे, विधानसभा प्रमुख- अनंत कोऱ्हाळे, प्रमोद कुटे, विधानसभा संघटिका- वैशाली मराठे, प्रतिक्षा घुले, उपसंघटिका- अनिता तुतारे, मंगला भोकरे, रोमी संधू, संतोष सौंदनकर, दिपक ढोरे, भाविक देशमुख, नवनाथ तरस, सोमनाथ गुजर, सुनिल ढोरे, अमोल निकम, सचिन चिंचवडे, श्रीमंत गिरी, रामचंद्र जमखंडी, पार्थ गुरव, संतोष तरस, विजय साने, नाना सोनार, विशाल गावडे, अनिकेत कल्याणकर, सुरेश राक्षे, बाळासाहेब वाल्हेकर, कार्यालय प्रमुख – बशीर सुतार, सचिव – ज्ञानेश्वर शिंदे व आदी पदाधिकारी, शिवसैनिक यावेळी उपस्थित होते
या प्रसंगी योगेश बाबर व सुलभा उबाळे यांनी शिवसेना शहर कार्यकारिणीच्या वतीने चिंचवडे यांचे स्वागत व सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी शहरकार्यकारिणीच्या वतीने पुढील कामकाजाचे नियोजन करण्याबाबत चर्चा विनिमय झाला.
यावेळी गजानन चिंचवडे यांनी पिंपरी चिंचवड शहर व मावळात सर्वाना बरोबर व विश्वासात घेऊन काम करणार असल्याचे स्पष्ट केले. शिवसेनेच्या माध्यमातून विधायक उपक्रम, सत्ताधारी व प्रशासनाच्या चुकीच्या कामाबद्दल तसेच नागरी समस्या सोडविण्यासाठी विभागनिहाय बैठका घेण्यासाठी शिवसेना शहरप्रमुख, शहरसंघटिका, गटनेते, नगरसेवक, विधानसभा प्रमुख, संघटक, समन्वयक, उपशहरप्रमुख, विभागप्रमुख, शाखाप्रमुख, शिवसेना महिला आघाडी व युवासेना यांच्या समवेत लवकरच चर्चा विनिमय करून संपर्क नेते, खासदार व आमदार यांच्या मार्गदर्शनानुसार पुढील दिशा ठरवली जाईल व आजपासूनच लोकाभिमुख व संघटनात्मक कामकाज सुरु करीत असल्याचे सांगितले.
















