मावळ तालुक्याच्यावतीने नवनिर्वाचित शिवसेना जिल्हा प्रमुख श्री गजानन चिंचवडे यांचे उत्स्फुर्त स्वागत करण्यात आले व त्यांचा तालुका प्रमुख राजू खांडभोर यांनी सन्मान केला.
कार्यक्रमास सल्लागार भारत ठाकुर संघटक सुरेश गायकवाड ,महिला आघाडी संघटक सौ आशाताई देशमुख, युवा सेना अधिकारी अनिकेत घुले व लोणावळा विरोधी पक्ष नेत्या शादान चौधरी , उपतालुकाप्रमुख मदन शेडगे , उपतालुका प्रमुख चंद्रकांत भोते, लोणावळा शहर प्रमुख सुनील इंगुळकर, नगरसेवक शिवदास पिल्ले, नगरसेविका कल्पना आखाडे , देहुरोड शहर प्रमुख महेश धुमाळ, कामशेत शहर प्रमुख सतीश इंगवले, उपशहप्रमुख लोणावळा- संजय भोईर, समन्वयक,लोणावळा शहर जयवंत दळवी, महिला उपसंघटिका संगीता ताई कंदारे, दिपाली भिल्लारे , बाळासाहेब फाटक , विभाग प्रमुख कालू हूलावळे , राम सावंत , जयदास ठाकर , सुनील शिंदे , नितीन बदर, सोमनाथ कोंडे, अशोक निकम, बबन खरात, दिपक कोकाटे, संदीप बालघरे, अमित ठाकर, अनिता गोणते, संतोष बोंबले, गणेश केदारी, मनीष पवार, शिवसैनिक व शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.
गजानन चिंचवडे यांनी मावळ तालुक्यातील एकूण १८२ महसुली गावे, १०३ ग्रामपंचायती, दोन नगरपालिका, एक नगरपंचायत व एक कँन्टोमेंट बोर्ड तसेच औद्योगिक क्षेत्र व पर्यटनस्थळ असणाऱ्या विविध भागातील शिवसैनिकांसमवेत विभाग निहाय सवांद साधला. व सर्वांच्या सूचना, संकल्पना ऐकूण घेऊन पुढील संघटनात्मक काम सर्वांना विश्वासात घेऊनच केले जाईल अशी ग्वाही दिली.
याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे यांनी मावळमध्ये प्रत्येक गावोगावी ग्रामपंचायत स्तरावर स्वत: जाऊन शिवसेनेचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच लोणावळा नगरपालिकेचे नगरसेवक, कँन्टोमेंट बोर्डाचे आजी माजी पदाधिकारी, निवडणूक लढलेले पराभूत उमेदवार व शिवसैनिक यांच्या भेटीगाठी घेऊन जनसामान्यांपर्यंत हिंदूहृद्यसम्राट श्री बाळासाहेब ठाकरे यांचे विचार व शिवसेनेची भूमिका पोहचविण्यासाठी संघटनेची मजबूत बांधणी करणार असल्याचे सांगितले. जवळपास ३,३१,००० मतदारसंख्या असणाऱ्या मतदार संघामध्ये शाखाप्रमुख, गटप्रमुख, यंत्रणा सक्षम करण्यासाठी आपण सर्वांनी संघटीत प्रयत्न करूयात असे आवाहन शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांना केले.
याप्रसंगी लोणावळा शहरातील क़मर हारून अन्सारी, हसरत गनी बेलीम, रोमेल होनारथ फ़र्नांन्डीस ( म.न.से. उप शहर प्रमुख), इमरान हनीफ़ तांबोली (सोनु), सैफ़ शकील अन्सारी या कार्यकर्त्यांनी जिल्हाप्रमुखाच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.
प्रास्ताविक तालुका प्रमुख राजू खांडभोर यांनी केले तर सूत्रसंचालन उपतालुकाप्रमुख मदन शेडगे यांनी केले आभारप्रदर्शन युवा सेना चिटणीस विशाल हुलावळे यांनी केले.















