औंध : रयत शिक्षण संस्थेचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, औंध. या ठिकाणी दिनांक 8 ऑगस्ट 2018 रोजी सकाळी ठीक 11:30 वाजता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील अर्थशास्त्र विभागाच्या नवनियुक्त अभ्यास मंडळ सदस्यांनी महाविद्यालयात भेट दिली. यामध्ये डॉ. तानाजी गीते (हुतात्मा राजगुरू महाविद्यालय, राजगुरुनगर.) डॉ. अरविंद शेलार (श्री सिद्धिविनायक महिला कॉलेज, कर्वेनगर.) डॉ. संभाजी काळे (जिजामाता महाविद्यालय भेंडा, कॉलेज, नेवासा.) डॉ. आशा पाटील (पंचवटी कॉलेज, नाशिक) डॉ. मेघना भोसले (अण्णासाहेब मगर कॉलेज, हडपसर.) डॉ.डी.बी. पवार (सर परशुराम महाविद्यालय, पुणे.) डॉ. वैशाली पाटील (एस एम जोशी कॉलेज, हडपसर.) प्राचार्य डॉ. मंजुश्री बोबडे (डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज, औंध, पुणे.) इतर सदस्यांनी पहिल्यांदाच महाविद्यालयातील अर्थशास्त्र विषयातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांसोबत अर्थशास्त्र विषयातील विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यात अर्थशास्त्र विषयाच्या नाविन्यपूर्ण अभ्यासक्रमाबाबत, अर्थशास्त्र विषयातील नोकरीच्या संधींबाबत, अर्थशास्त्र विषयाच्या व्यवसायभिमुख अभ्यासक्रमाबाबत चर्चा करण्यात आली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागाच्या अभ्यास मंडळावर नवनियुक्त झालेल्या सदस्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद केल्यानंतर, महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. मंजुश्री बोबडे मॅडम म्हणाल्या की, पुणे विद्यापीठातील अभ्यास मंडळावरील सदस्यांनी एकत्रीतपणे महाविद्यालयात भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याची ही पहिलीच वेळ आहे. विद्यार्थ्यांनी केलेल्या सूचनेनुसार अभ्यास मंडळावरील सदस्य व्यवसायाभिमुख अभ्यासक्रम तयार करतील. ज्यामुळे विद्यार्थ्यांना प्रायव्हेट आणि कार्पोरेट सेक्टरमध्ये नोकरीच्या विविध संधी उपलब्ध होतील. या कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या सर्व सदस्यांचे महाविद्यालयातर्फे स्वागत आणि सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आय. क्यू. ए. सी. कमिटीच्या चेअरमन डॉ. सविता पाटील यांनी केले. तर कार्यक्रमाचे आभार डॉ. तानाजी हातेकर यांनी केले. या कार्यक्रमासाठी प्रा. नलिनी पाचरणे, डॉ.शशी कराळे, प्रा. एकनाथ झावरे, प्रा. सुप्रिया पवार, प्रा. किरण कुंभार डॉ.अतुल चौरे उपस्थित होते.
“सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील अभ्यास मंडळ सदस्यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात भेट”
















