न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ मार्च २०२०) :- करोना व्हायरसची दहशत लक्षात घेऊन देहू येथील तुकाराम महाराज मंदिर २३ मार्चपर्यंत आणि आळंदी येथील ज्ञानेश्वर माऊली मंदिर ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे.
करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्रातील अनेक प्रमुख मंदिरांनी मंदिरं बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यामध्ये शिर्डीचं साईबाबा मंदिर, शनि शिंगणापूरचे शनि मंदिर, पालीचे बल्लाळेश्वर मंदिर, तुळजाभवानी मंदिर, त्र्यंबकेश्वर येथील शंकराचे मंदिर, मुंबई येथील सिद्धिविनायक मंदिर, शेगावचे गजान महाराज मंदिर, अंबेजोगाई येथील अंबाबाई मंदिर ही मंदिरं बंद ठेवण्यात आली आहेत. यामध्ये आता देहू आणि आळंदी येथील मंदिरांचीही समावेश झाला आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये महाराष्ट्रात सर्वात जास्त करोना ग्रस्त असल्याने प्रशासन आणि स्थानिक पातळीवर अनेक निर्णय घेतले जात आहेत. त्याचमुळे आळंदी विश्वस्तांनी १८ मार्च ते ३१ मार्च दरम्यान ज्ञानेश्वर माऊलींचे मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.















