न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी :- पिंपरी चिंचवड शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेना पदाधिकारी व मनसैनिकांची बैठक शनिवार (दि.२७ ऑक्टो.) रोजी आकुर्डी येथे प्रभारी किशोर शिदे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली.
यावेळी पिंपरी चिंचवड शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेना, महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना, महाराष्ट्र नवनिर्माण वाहतुक सेना, महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेना, महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे अध्यक्ष, उपशहर अध्यक्ष व पदाधिकारी, मनसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यात उपविभागीय अध्यक्ष, प्रभाग अध्यक्ष, गट अध्यक्ष, शाखा विस्तार व उद्घाटन या विषयावर बैठकीत चर्चा झाली. शहराध्यक्ष सचिन चिखले व प्रभारी किशोर शिदे यांनी मनसैनिकांना यावेळी मार्गदर्शन केले तसेच नविन कार्यकर्त्यांचा पक्षीय समावेश करण्यात आला, अशी माहिती शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी दिली.