न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ मार्च २०२०) :- करोनाबाबत अफवा सोशल मीडियावर पसरविण्याच्यांवर लक्ष असल्याचे आयुक्त बिष्णोई म्हणाले. ‘ करोना ‘ च्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तालयात येण्यास नागरिकांना बंदी घालण्यात आलेली नाही. मात्र, नागरिकांनी अधिकाऱ्यांना अनावश्यक भेटणे टाळावे. आपली तक्रार वरिष्ठांसमोर मांडण्यासाठी ई – मेल किंवा ई – कम्प्लेंटचाही वापर करावा, असे आवाहन पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी केले आहे.
करोना विषाणूंचा प्रसार होऊ नये म्हणून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने महापालिका मुख्यालयात नागरिकांना येण्यास बंदी घातली आहे. असाच निर्णय पोलीस आयुक्तालयात येणाऱ्या नागरिकांसाठी घेणार का? अशी विचारणा केली असता आयुक्त संदीप बिष्णोई म्हणाले, महापालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांच्या कामात तफावत आहे. यामुळे नागरिकांना पोलीस आयुक्तालयात येण्यापासून रोखता येणार नाही. मात्र, नागरिकांनीही पोलीस आयुक्तालयात येण्याचे टाळावे. त्यांनी आपले म्हणणे मांडण्यासाठी ई – मेल स किंवा ई-कम्प्लेंटचा वापर करावा.
प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करण्यासाठी १४४ कलम लागू करण्यात आले आहे. त्यामध्ये संचारबंदी आणि जमावबंदी नाही. यापुढील काळात जमावबंदी करायची किंवा नाही, याबाबत जिल्हाधिकारी आणि महसूल आयुक्त यांची समिती निर्णय घेईल. करोनाचा रुग्ण आणि प्रसार याबाबत माहिती देण्याचे अधिकार जिल्हाधिका-यांना आहेत. मात्र करोनाबाबत अफवा सोशल मीडियावर पसरविण्याच्यांवरही लक्ष असल्याचे आयुक्त बिष्णोई म्हणाले.















