न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८. मार्च २०२०) :- आरोपी वाघ याने आपल्या मोबाइल क्रमांक 8149414934 यावरून सुमित वाघ या नावाने अकाऊंट असलेल्या फेसबुकवर लहान मुलाची अश्लिल चित्रफित लाइक करून ती शेअर केली. ही घटना 11 मे 2019 रोजी घडली.
सुमित मधुसूदन वाघ (वय 24, रा. चारभुजा क्लासिक, इंद्रायणीनगर, भोसरी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. भोसरी पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन बनसोडे यांनी मंगळवारी (दि. 17) याबाबत फिर्याद दिली आहे. याबाबत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्याला अटक केली असून, भोसरी पोलीस तपास करीत आहेत.












