न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ मार्च २०२०) :- रावेत येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात दोघेजण संशयितरित्या थांबले असून, त्यांच्याकडे पिस्तूल असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट पाचला मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी परिसरात सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले.
त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे एक लाख ५४ हजार ५०० रुपये किमतीचे तीन पिस्टल आणि तीन जिवंत काडतुसे आढळून आली. त्यामुळे पोलिसांनी दोघांवर भारतीय शस्त्र अधिनियम, महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली.
ही कारवाई रावेत येथे बुधवारी (दि,. १८) करण्यात आली. मनोज विष्णू जगताप (वय २०, रा. हडपसर, मूळ रा. अहमदनगर), जॉन काशिनो परेरा (वय ३१, रा. नालेगाव वाघगल्ली, ता. नगर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस शिपाई ज्ञानेश्वर शंकर गाडेकर यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.













