न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ मार्च २०२०) :- करोना या संसर्गजंन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर बोपखेलमधील पार्थ अजित पवार सोशल फाऊंडेशन, शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस तसेच पोलीस पाटील ग्रुपच्या वतीने आमदार आण्णा बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली बोपखेल गावठाण, रामनगर, गणेशनगर भागातील नागरिकांना बिकानेर स्वीटजवळील संपर्क कार्यालयात उच्च दर्जाच्या मास्कचे मोफत वाटप करण्यात आले.
यावेळी पांडुरंग तात्या घुले पाटील, सोपान आप्पा घुले पाटील, पिं.चिं.रा.काॅं.उपाध्यक्ष शशिकांतभाऊ घुले, युवा नेते समीरशेठ झपके, जेष्ठ नागरिक संघ अध्यक्ष नामदेव गोगावले, हनुमंतभाऊ घुले, दिनेशभाऊ मोरे, उद्योजक राहुलशेठ गावडे, युवा नेते संतोषभाऊ देवकर, दलित पॅंथरचे अध्यक्ष महेंद्रभाऊ वाघमारे, समाजसेवक संतोष ज्ञानोबा घुले, श्रीकांत घुले सर, मराठा प्रतिष्ठानचे संस्थापक मोजेसभाऊ ससाणे, अशोक आप्पा बाराथे, पै. भाग्यदेव घुले, अनिलशेठ झपके, पै. स्वप्निल अशोक घुले, आलिशान ग्रुपचे अध्यक्ष आकाश काळभोर, पै. अमोल झपके, राजेंद्रभाऊ कदम, पै. सोमनाथ गोगावले, चेतनशेठ पद्माकर घुले, जियाऊद्दीन नागूर, पवन सिंगजी, किरणभाऊ पाटोळे, पै. सोमा तोडींलकर, अनिलजी बेनाडे, श्याम मेवाती, किन्नीरामजी चटोले, दिपक वाल्मिकी, मनसे कार्यकर्ते आविनाश घुले, विक्रमजित सिंग कतनोरिया व अन्य तसेच कार्यक्रमाचे आयोजक ओंकार घुले पाटील, वृषभ घुले पाटील उपस्थित होते.













