न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे (पिंपरी) :- शिवसेनच्या शिष्टमंडळाने विविध मागण्यांसाठी उपोषणास बसलेल्या योगेश ढगे व त्यांच्या सहकाऱ्यांची भेट घेतली व आंदोलनास बिनशर्त पाठींबा दिला आहे.
झील एज्युकेशन सोसायटीमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अभियांत्रिकी परीक्षेत झालेल्या गैरप्रकाराबाबत नेमलेल्या चौकशी समितीचा अहवाल २५ ऑक्टोबरपर्यंत जाहीर करावा, तसेच समाजकल्याण विभागातर्फे मिळालेल्या २० ते २२ कोटी अनुदान घोटाळ्याची चौकशी व्हावी आदी मागण्यांसाठी योगेश ढगे व त्यांचे सहकारी उपोषणास बसले आहेत.
यावेळी ऍड. वैभव थोरात (सिनेट सदस्य-मुंबई विद्यापीठ, युवासेना विस्तारक, पिंपरी-चिंचवड, मावळ), दिपकजी शेडे (शिवसेना संपर्कप्रमुख-नांदेड दक्षिण विधानसभा व सदस्य-अँटी रॅगिंग समिती महाराष्ट्र शासन), जितेंद्र ननावरे (शिवसेना संघटक – पिंपरी विधानसभा), संतोष सौंदणकर (शिवसेना संघटक -चिंचवड विधानसभा), चैतन्य बनसोडे (सहसचिव-युवासेना) आदी उपस्थित होते.
युवासेनेतर्फे लवकरच शिवसेनेचे उच्च तंत्र शिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांची भेट घेऊन, त्यांच्यामार्फत हा विषय तडीस नेणार आहेत, तसेच पुण्यातील अनेक अभियांत्रिकी, व्यवस्थापन कॉलेजमधील अनेक गैरप्रकार उघडकीस येत असून, विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान युवासेनेमार्फत सोडविणार असल्याचे आश्वासन यावेळी आंदोलकांना दिले.