न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिखली :- आगामी निवडणुकीच्या निमित्ताने आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली रविवार (दि. २८ ऑक्टो.) रोजी भोसरी मतदारसंघातील चिखली कुदळवाडी येथे विशेष मतदार नोंदणी मोहिमेअंतर्गत, मतदार नोंदणी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
राज्य निवडणूक आयोगातर्फे मतदारांना यादीत नाव नोंदण्यासाठी ‘विशेष मतदार नोंदणी मोहीम’ राबविण्यात आली होती. यात नवीन नाव नोंदणी, मतदारांच्या नावात अथवा पत्त्यामध्ये बदल तसेच दिव्यांग मतदार नोंदणी करण्याचीही सुविधा मतदान नोंदणी केंद्रावर उपलब्ध करून देण्यात आली होती.
परिसरातील नागरिकांनी ओळखीचा पुरावा, रहिवासी पुरावा, जन्म दिनांक पुरावा यापैकी उपलब्ध कागदपत्रांपैकी एका कागदपत्राची स्व-साक्षांकित प्रत अर्जासोबत जोडून आपल्या नावाची नोंद केली व अर्ज जमा केल्याची पावती घेतली. या मोहिमेत परिसरातील नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून मतदार नोंदणी केली, अशी माहिती स्वी. नगरसेवक दिनेश यादव यांनी दिली.
यावेळी स्वी. नगरसेवक दिनेश यादव, आदिनाथ यादव, विशाल सातव, किशोर लोंढे, चंद्रकांत जाधव, अमित बालघरे आदींनी अभियान यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.