न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (मावळ) :- मावळ लोकसभा मतदार संघाची जाहीर सभा १ नोव्हेंबर २०१८ रोजी दुपारी ३:०० वाजता कर्जत शहर, पोलीस ग्राऊंड परिसरात होणार आहे. या सभेस शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे संबोधित करणार आहेत.
या सभेस उद्योगमंत्री सुभाष देसाई, खासदार श्रीरंग बारणे, आमदार मनोहर भोईर, आमदार गौतम चाबुकस्वार व जिल्हा प्रमुख गजानन चिंचवडे उपस्थित राहणार आहेत.
सभेची पूर्वतयारी करण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आकुर्डी येथिल शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात दिनांक ३० ऑक्टोबर २०१८ रोजी दुपारी २:०० वाजता आयोजित केली आहे. सर्व पदाधिकाऱ्यांनी वेळेवर उपस्थित रहावे असे आवाहन शहरप्रमुख योगेश बाबर यांनी केले आहे.