न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ मार्च २०२०) :- करोनाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महापालिकेने महापालिकेतील कामकाजात बदल केले आहेत. कार्यालयातील एकूण अधिकारी / कर्मचारी यांची संख्या किमान ५० टक्के राहील, याची सर्व विभागप्रमुखांनी दक्षता घेण्यात यावी, असा आदेश महापालिका आयुक्त हर्डीकर यांनी लागू केला आहे.
दिलेल्या आदेशात आयुक्तांनी म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्य शासनाने ” कोरोना ” विषाणूचा COVID – १९ प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ दिनांक १३ मार्च , २०२० पासून लागु करुन खंड २ , ३ व ४ मधील तरतुदीनुसार अधिसूचना निर्गमित केलेली आहे. प्रस्तुत विषयाचे कामकाजासंदर्भात वेळोवेळी मा. विभागीय आयुक्त, मा. जिल्हाधिकारी, मा. आयुक्त व शासनस्तरावरुन बैठका घेवून उपाययोजना करण्यासंदर्भात युध्द पातळीवर निर्णय घेण्यात येत आहेत. त्याअनुषंगाने “ कोरोना ” विषाणूचा प्रादुर्भाव रोखणसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून पिंपरी चिंचवड कार्यक्षेत्रातील सर्व शाळा, महाविद्यालये, आय . टी . आय, उद्याने, क्रीडांगने, सार्वजनिक वाचनालये, अभ्यासिका, महानगरपालिका मुख्य प्रशासकीय कार्यालय नागरीकांसाठी बंद करण्यात आलेली आहेत. तसेच महापालिकेचे अधिकारी / कर्मचारी कार्यालयात उपलब्ध असणेचे दृष्टीने आदेश क्रमांक प्रशा / / कावि / ३२० / २०२० दिनांक १३ / ०३ / २०२० अन्वये सर्वांच्या रजा रद्द करण्याचे आदेश निर्गत करण्यात आलेले आहेत.
तथापि, वरील पार्श्वभूमीवर कोरोना विषाणूंचा COVID – १९ प्रसार राज्यातील कार्यालयांमध्ये होऊ नये तसेच राज्यातील अधिकारी / कर्मचारी यांना त्यांचा संसर्ग होऊ नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमधील गर्दी कमी करणे आवश्यक आहे. त्यामुळे तातडीची उपाययोजना म्हणून राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांना महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्रमांक : समय २०२० / प्र . क्र . ३५ / १८ ( र . व . का . ) दिनांक १८ मार्च, २०२० अन्वये “ कोरोना ” विषाणू COVID – १९ प्रसारावरील प्रतिबंधात्मक उपाय म्हणून राज्य शासकीय कार्यालयांतील अधिकारी / कर्मचारी यांची उपस्थिती नियंत्रित करण्याबाबत निर्देश देण्यात आलेले आहेत. त्याअनुषंगाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व कार्यालयांना पुढील प्रमाणे निर्देश देण्यात येत आहेत.
- महानगरपालिका कार्यालयाचे तातडीचे व महत्वाचे काम चालू राहण्याच्या दृष्टीने संबंधित विभागप्रमुख / कार्यालय प्रमुख यांनी, त्यांचे नियंत्रणाखालील सर्व अधिकारी / कर्मचारी यांना दररोज कार्यालयात न बोलाविता त्यांना आळीपाळीने ( Rotation ) कार्यालयात बोलवावे. तसेच अन्य अधिकारी / कर्मचारी यांची कार्यालयीन कामकाजाचे आवश्यकतेनुसार विभाग प्रमुख / कार्यालय प्रमुख यांनी त्यांचे स्तरावर निर्णय घेवून रजा मंजूर कराव्यात. अशा प्रकारे कार्यवाही केलेमुळे कार्यालयातील वाहतूक व्यवस्थेमधील अनावश्यक गर्दी कमी होऊ शकेल. वरील प्रमाणे कार्यवाही करताना कार्यालयातील एकूण अधिकारी / कर्मचारी यांची संख्या किमान ५० टक्के राहील, याची सर्व विभागप्रमुखांनी दक्षता घेण्यात यावी. अशा प्रकारे ज्या अधिकारी / कर्मचारी यांना कार्यालयात अनुपस्थित राहण्याकरिता रजा मिळेल, त्यांनी त्यांची प्रलंबित राहिलेली कामे कार्यालयातील उपस्थितीच्या दिवशी पूर्ण करावीत.
- वरील अनुक्रमांक – १ बाबत संबंधित विभागाचे स्तरावर अधिकारी / कर्मचारी यांच्या उपस्थितीबाबतची उचित नोंद घेणेत यावी.
- महानगरपालिका कार्यालयातील जे अधिकारी / कर्मचारी या आपत्कालीन परिस्थितीत रजा घेऊ इच्छितात त्यांना तातडीने रजा मंजूर करावी. तसेच वैद्यकीय प्रमापत्र सादर न करता परिवर्तित रजासुध्दा संबंधितांना मंजूर करण्यास हरकत नाही.
- सर्व विभागप्रमुखांनी त्यांचे नियंत्रणाखाली कार्यरत असलेल्या सर्व अधिकारी / कर्मचारी यांचा संपर्क पत्ता, मोबाईल क्रमांक, ई – मेल आयडी कार्यालयास उपलब्ध करुन घ्यावेत. याबाबतच्या नोंदी ठेवाव्यात तसेच कार्यालयास ज्यावेळेस अशा कर्मचा – यांची आवश्यकता भासेल त्यावेळेस संपर्क साधल्यानंतर ते उपलब्ध होतील याची दक्षता घ्यावी. तसेच कार्यालयात उपस्थित राहण्याच्या सूचना प्राप्त झाल्या नंतर अशा कर्मचा यांनी कार्यालयामध्ये उपस्थित राहणे अनिवार्य राहील.
- कोरोना विषाणू ( COVID – १९ ) संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाचे उपाययोजनेकरीता प्रशासन, वैद्यकीय व आरोग्य विभाग व इतर विभागप्रमुखांमार्फत ज्या अधिकारी / कर्मचा – यांच्या नेमणूका करण्यात आलेल्या आहेत अशा कर्मचा – यांच्या व महापालिकेच्या सर्व अत्यावश्यक सेवा देत असलेले विभाग, आपत्कालीन विभाग व कार्यालयाबाहेर भेटी देणे आवश्यक असते ( Field Duties ) अशा कार्यालयांना उपरोक्त आदेश लागू राहणार नाहीत. तसेच अशा विभागामधील कर्मचा – यांना वैद्यकीय कारणांखेरीज वरील प्रमाणे देय असलेल्या रजा देय राहणार नाहीत, याची सर्व संबंधित विभाग प्रमुखांनी अंमलबजावणी करावी.
- ज्या विभागप्रमुखांकडे महापालिकेतील नागरीकांना अत्यावश्यक सेवा पुरविण्याचे कामकाज सोपविलेले आहे. त्यांनी त्यांचे विभागातील सेवा पुरविणेचे कामकाजामध्ये कोणत्याही स्वरुपाच्या तक्रारी येणार नाहीत याची खबरदारी घेवून आवश्यक त्या प्रमाणातच सदरची रजा मंजूर करणेबाबत खबरदारी घ्यावी.
- सदरचे आदेश दिनांक ३१ मार्च , २०२० पर्यंत फक्त आपत्कालीन परिस्थिती म्हणून लागू राहतील.













