न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ मार्च २०२०) :- करोनाच्या प्रादुर्भावानंतर नागरिकांनीही मास्क आणि हँड सॅनिटायजर विकत घेण्यासाठी मेडीकल दुकानांवर गर्दी केली आहे. राज्यात अनेक ठिकाणी दुकानदार मास्क आणि सॅनिटायजरचा काळाबाजर करत असल्याचं समोर आलं होतं.
हा प्रकार थांबवण्यासाठी केंद्र सरकारने महत्वाचं पाऊल टाकलं आहे. केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी, ट्विटर अकाऊंटवरुन, मास्क आणि सॅनिटायजरच्या किमती केंद्र सरकारने निश्चित केल्याचं सांगितलं आहे. ज्यामध्ये मास्कसाठी ८ ते १० रुपये आणि सॅनिटायजरच्या २०० मि.ली बाटलीची किंमत ही १०० रुपये असेल असं पासवान यांनी सांगितले आहे.















