न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ मार्च २०२०) :- पुण्यात आणखी एक रुग्ण करोना पॉझिटिव्ह आढळला आहे. अशी माहिती पुण्याचे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी दिली आहे.
दीपक म्हैसेकर यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती त्यांनी दिली. या रुग्णाला तातडीने नायडू रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे असंही त्यांनी सांगितलं. तसंच जे होम क्वारंटाईन करण्यात आलेले रुग्ण आहेत त्यांनी घराबाहेर पडू नये असंही आवाहन आज म्हैसेकर यांनी पुन्हा एकदा केलं.















