न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ मार्च २०२०) :- जागतिक महामारी असलेल्या करोनाशी लढण्यासाठी १५ हजार कोटींची तरतूद करण्यात आल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. बुधवारी देशवासियांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली.
मोदी म्हणाले, करोना विषाणग्रस्तांची चाचणी करण्यासाठीच्या सुविधा, पर्सनल प्रोटेक्टिव इक्विपमेंट (PPE), अतिदक्षता विभाग (ICU), व्हेंटिलेटर्स आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठीचे प्रशिक्षण या बाबींसाठी १५ हजार कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.













