न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ मार्च २०२०) :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम १८८ अन्वये नागरिकांवर कारवाई केली आहे. त्या अंतर्गत १६ ते २५ मार्च दरम्यान ३६३ गुन्हे दाखल झाले आहेत. यात बुधवारी (दि. २५ ) रोजी विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत ७३ गुन्हे दाखल करण्यात आले.
तसेच काही वाहनचालकांना दंडक्यांचा चोप देण्यात आला. काहींना पोलिसांनी रस्त्यावरच उठाबशा काढण्यास सांगितले. गल्लीबोळांतील टोळक्यांना पांगवले. शहरातील मुख्य रस्त्यांवरील गर्दी कमी झाली आहे. अत्यावश्यक सेवेतील वाहनांची ये – जा या रस्त्यांवर दिसून येते. मात्र शहरातील काही भागांतील गल्लीबोळात काही नागरिक एकत्र येत आहेत. टोळक्याने गप्पांची मैफल रंगविली जात आहे. त्यामुळे जमावबंदी व संचारबंदी कायद्याचे उल्लंघन त्यांच्याकडून होत आहे. अशा टोळक्यांना पांगविण्यासाठी पोलिसांना कसरत करावी लागत आहे. अशा टोळक्यांवर व गल्लीबोळात हुल्लडबाजी करणा-यांवर देखील कारवाई करून पोलिसाकडून गुन्हे दाखल करण्यात येत आहेत.
शहरातील पोलीस ठाणेनिहाय बुधवारी दाखल गुन्हे :-
भोसरी – ४. चिंचवड – ७, चिखली – ३, हिंजवडी – १२, आळंदी – ४, चाकण – ३, वाकड – ६, एमआयडीसी भोसरी – ९, निगडी – ८, पिंपरी – ४, सांगवी – ४, दिघी – २, देहूरोड – ७.












