न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३ एप्रिल २०२०) :- राष्ट्रवादीचे माजी उपमहापौर डब्बू आसवानी यांच्या हत्येचा आरपीआयच्या शहाराध्यक्षाने कट रचला. याबाबत डब्बू आसवानी यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता. त्यावर चौकशी करून पोलिसांनी कलमवाढ करून गुन्हा दाखल केला.
तसेच पोलिसांनी निकाळजे याला अटक केली. न्यायालयाने निकाळजे याला चार दिवसांनी पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपी हा रिपब्लिकन पक्षाचा (आठवले गट) शहराध्यक्ष आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.















