न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३ एप्रिल २०२०) :- देशामध्ये कोरोनाचा संसंर्ग झालेल्यांची संख्या २५६६ वर पोहोचली आहे. त्यापैकी १९१ लोक कोरोनामुक्त झाले आहेत. तर ५३ लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. मागील २४ तासांमध्ये ३२८ नवी रूग्ण समोर आले आहेत. महाराष्ट्रात ३३९, केरळमध्ये २८६, तामिळनाडूमध्ये ३०९, दिल्लीमध्ये २१९, आंध्र प्रदेशमध्ये १३५, राजस्थानमध्ये १३३, तेलंगणामध्ये १२७, कर्नाटकामध्ये १२१, उत्तरप्रदेशमध्ये १२१, मध्यप्रदेशात ९८ रूग्ण आढळून आले आहेत.
गुरुवारी दिल्लीमध्ये अढळून आलेल्या १४१ करोनारुग्णांपैकी १२९ रुग्ण हे मरकजच्या कार्यक्रमाला उपस्थित असणारे किंवा तेथे जाऊन आलेल्यांना भेटलेले निघाले. कोरोना विषाणूचं संकट देशाभोवती आपले पाश अधिक घट्ट करत चालला आहे, दिवसेंदिवस देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार देशात सध्याच्या घडीला कोरोना बाधितांचा आकडा २३०१ वर पोहोचला आहे, मात्र दिलासादाक बातमी अशी की यातल्या १५६ लोकांनी आजारावर मात केली आहे त्यांना डिस्चार्जही देण्यात आला आहे.
सध्याच्या घडीला राज्यातला आकडा हा ४२३ आहे. यातल्या ४२ जणांना आतापर्यंत डिस्चार्ज दिला आहे. तर कोरोनामुळे देशात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ही ५६ वर पोहोचली आहे.












