न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३ एप्रिल २०२०) :- दिल्लीतील निजामुद्दीन येथील धार्मिक कार्यक्रमाहून आलेल्या व्यक्तींचा शोध घेऊन पिंपरी चिंचवड पोलीस आणि महानगर पालिकेच्या आरोग्य प्रशासनाने त्यांना रुग्णालयात दाखल केलं.
त्यांच्या घशातील द्रव्यांचे नमुने पुण्यातील एनआयव्ही येथे पाठवण्यात आले असून, त्यातील सहा जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले तर दोन जणांचे पॉझिटिव्ह रिपोर्ट आले आहेत. या दोन्ही व्यक्तींचा अहवाल गुरुवारी दुपारी आला होता.
दरम्यान, त्यानंतर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी दोघे राहात असलेला परिसर तातडीने सील केला आहे. अशी माहिती अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी दिली आहे. अद्याप आणखी अहवाल येणे बाकी आहेत. त्यामुळे करोना बधितांचा आकडा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.













![[ब्रेकिंग न्यूज] लाचखोरीच्या आरोपानंतर मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे निलंबित!...](https://newspcmc.com/wp-content/uploads/2026/11/Screenshot_20261104_200149_Google-190x122.jpg)




