- युवानेते पांडाभाऊ साने यांचे शहरातील उद्योजकांना आवाहन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३ एप्रिल २०२०) :- केंद्र व राज्य शासनाने राज्यात २१ दिवसाचे लाकॅडाऊन जाहिर केले आहे. कोरोना आजाराचा संसर्ग व फैलाव रोखण्यासाठी घेण्यात आलेला हा निर्णय व आदेश कौतुकास्पद आणि देशाच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचा आहे. सर्व देशभरातील नागरीक या आदेशाचे पालन करणे हे आपले प्रथम कर्तव्य समजून घरातच राहत आहेत. आज जवळपास एक महिना झाला तरी हे संकट अजूनही जाग्यावरच आहे. मात्र, हातावर पोट असणारे, मजूरी करुन दररोज आपली उपजिविका भागवणारे कष्टकरी, औद्योगिक कामगार, दुकानात काम करणारे नोकरदार हे घरीच असल्याने कुटुंबाची उपजिविका भागवण्यासाठी हतबल झाले आहेत. दरम्यान अन्नधान्य व जिवनावश्यक वस्तुंचा पुरवठा नियमितपणे होणार असला तरी, तो खरेदी करण्यासाठी खिशात पैसे हवेत.
गोरगरीब मजूर व सर्वसामान्य नोकरदार यांना मार्च महिन्याचा पगार मिळेल की नाही या समस्येने ग्रासलेले आहे. त्यामुळे शहरातील सर्व कारखाना, कंपन्या, शॉप, दुकान, बांधकाम कंत्राटदार, कामगार कंत्राटदार यांनी सहानुभूतीपूर्वक उदार हेतूने या चाकरमान्यांना मार्च महिन्याचा जो काही पगार असेल तो द्यावा, जेणेकरून कोरोनाशी दोन हात करण्याकरीता त्यांना बळ मिळेल, असे आवाहन युवानेते पांडाभाऊ साने यांनी केले आहे.
तसेच नागरिकांना काही अडचण असल्यास त्यांनी पांडाभाऊ साने यांचे चिखलीतील जनसंपर्क कार्यालय अथवा 9764642004 / 9823606018/ 7350733535/ 9096102108 / 9881471669 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही साने यांनी केले आहे.













