- मात्र शहरावर कोरोनाचे भूत कायम; एकाचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३ एप्रिल २०२०) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या रुग्णालयात दाखल असलेल्या १२ व्या रुग्णाचे १४ दिवसांचे पहिले रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. हा रुग्ण कोरोनामुक्तीच्या मार्गावर आहे. मात्र या आनंदावर विरजण घालण्याचे काम दिल्लीतील कोरोनाबाधीतांनी केले आहे. त्यामुळे शहरातील पहिले बाराही रुग्ण कोरोनामुक्त होतील व शहराला सुखद धक्का मिळू शकेल.
आज दिल्ली येथिल निजामुद्दीन परिसरातील उद्रेकाच्या अनुषंगाने तबलीग जमातीच्या बंगलेवाली मशिद, नवी दिल्ली या धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या २३ नागरिकांच्या हाय रिस्क संपर्कात आलेल्या एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. त्यामुळे शहरातील पहिले बाराही रुग्ण कोरोनामुक्त होतील. शहराला सुखद धक्का मिळू शकतो.
पिंपरी-चिंचवड शहरात २० मार्च रोजी कोरोनाचा शेवटचा रुग्ण आढळला होता. त्यानंतर सलग १२ दिवस शहरातही एकही नवीन कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळला नव्हता. त्यामुळे शहर कोरोनामुक्त होत असल्याने आनंदाचे वातावरण होते. परंतु, दिल्लीच्या धार्मिक कार्यक्रमातून शहरात आलेल्यांपैकी दोघांना व आज एकाला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे शहरातील कोरोना रुग्णांची संख्या ३ झाली आहे.












