न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३ एप्रिल २०२०) :- वाकडमध्ये परिसरात लहान मुले क्रिकेट खेळत होती. मुलांच्या क्रिकेट खेळण्याचा फिर्यादी लोंढे यांना त्रास होत होता. त्यामुळे लोंढे आरोपीला याबाबत सांगण्यासाठी गेले.
त्यावेळी आरोपीने लोंढे यांच्या डोक्यात लोखंडी सुरा मारून जखमी केले. ही घटना गुरुवारी (दि. २) दुपारी काळाखडक, वाकड येथे घडली. मल्हारी मोतीराम लोंढे (वय २९, रा. काळाखडक, वाकड) असे जखमी तरुणाचे नाव आहे.
याप्रकरणी त्यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी भरत गिरमा जोगदंड याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.












