न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ४ एप्रिल २०२०) :- मागील २४ तासांमध्ये ५२५ करोना रुग्ण भारतात आढळले आहेत. त्यामुळे भारताची रुग्णसंख्या ३०७२ वर जाऊन पोहचली आहे. ३०७२ रुग्णांपैकी २१३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. २७८४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर आत्तापर्यंत ७५ जणांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली आहे.
अशीच परिस्थिती पुणे विभागात देखील आढळून येत असून आज पर्यंत १०४ पर्यंत ही संख्या पोहोचली आहे. तर आज दिवसभरात तीन नवीन रुग्ण बाधित आढळले पुणे विभागात येणार्या जिल्ह्यामध्ये पुणे ७४, सांगली २५, कोल्हापूर २ आणि सातारा ३ अशी एकूण आज अखेर १०४ रुग्ण बाधित आढळले आहे.













