न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ५ एप्रिल २०२०) :- कोरोना महामारीमुळे शहरात लोकडाऊन जाहीर केले. अचानक उद्भवलेल्या या संकटाला सामोरे जाताना गरिबांची त्रेधा उडाली. या समाजाच्या मदतीसाठी अनेक संस्था, दानशूरांचा दातृत्वासाठी पुढे आल्या. आपलाही खारीचा वाटा यात असावा या भावनेतून पिंपरी चिंचवड म. न.पा. शिक्षण मंडळाचे माजी उपसभापती व समाजसेवी शाम साधुराम आगरवाल यांच्या परिवारच्या वतीने पिंपरी चिंचवड औद्योगिक शहरात विविध ठिकाणी जाऊन दीर्घ लोकडाऊनमुळे अडकलेल्या लांब पल्ल्याच्या ट्रक ड्रायव्हर, क्लिनर, सेवक, टेम्पो चालक यांना जीवनावश्यक किराणा सामानाचे कीट करून वाटप केले.
एम.आय.डी.सी भागात सुमारे ५५० किटचे वितरण करण्यात आले. यामध्ये गहूपीठ, तेल, चहा, साखर, कांदा मसाला पाकीट, सॅनिटाइझर, साबण, मास्क आदी साहित्याचा समावेश ह्यामध्ये होता.
चित्रपट निर्माता शाम आगरवाल म्हणाले की, हे ड्रायव्हर परिवारापासून दूर असतात, बहुतांश हे परराज्यातील रहिवासी असतात. त्यांच्याकडील किराणा संपल्यामुळे अडचणीत असल्याचे समजले. त्यामुळे या गरजवंतांना मदत केली. आमच्या मातोश्री कै. विद्यादेवी साधुराम आगरवाल यांनी भोसरीमध्ये अत्यंत गरिबीतून संसार सांभाळला. परिसरातील अनेक गरजवंत परिवारास मदत केली आहे. हाच आदर्श ठेऊन आम्ही वेळोवेळी मदतीला जातो. केलेली मदत सांगायची नाही. याप्रमाणे संकटात यथाशक्ती मदत करतो. या मदत कार्यात शाम एजन्सी चे संचालक बाळासाहेब आगरवाल, युवा उद्योजक राकेश आगरवाल, दीपक आगरवाल, संतोष आगरवाल यांनी सहकार्य केले.













