न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ५ एप्रिल २०२०) :- लोणावळ्याजवळील बोरघाटातून मुंबई पुण्याला जोडणारा ऐतिहासिक अमृतांजन पूल आज (रविवार) तोडण्यात आला. सध्या करोनामुळे असलेल्या लाॅकडाउन व प्रवासबंदीमुळे वाहतूक रोडावल्याचे निमित्त साधत हे काम करण्यात आले.
एक्स्प्रेस वे झाल्यानंतरही अमृतांजन पूलाच्या ठिकाणी नेहमी वाहतूक कोंडी होती. जलदगती मार्ग जरी झाला असला तरी या पुलाजवळील काही प्रवासी पट्टा जुन्या महामार्गाला व जलदगती मार्गाला सामाईक आहे त्यामुळेच येथे कायम वाहतूक कोंडी होत असते.
यावर कायमस्वरुपी उपाय म्हणून पर्यायी मार्ग व उड्डाण पुलांचे काम सुरू आहे. दरम्यान जीर्ण झालेला व अडचणीचा ठरत असलेला ऐतिहासिक पूल पाडण्यात आला आहे.













