न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ९ एप्रिल २०२०) :- पंतप्रधान जनधन योजनेत बॅंकेत बचत खाते उघडलेल्या महिलांच्या खात्यावर पुढील तीन महिने प्रति महिला पाचशे रुपये रक्कम जमा करण्यास प्रारंभ झाला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लादलेल्या लॉकडाउनच्या काळात ही रक्कम कुटुंबांसाठी आधार ठरणार आहे.
योजनेअंतर्गत ही रक्कम सदर महिला खातेदारांना दिली जाणार असून एप्रिल महिन्याची रक्कम दिनांक २ एप्रिल रोजी संबंधित बँकांकडे सरकारकडून वर्ग करण्यात आली आहे. ही रक्कम बँकांनी तत्काळ जनधन खाते असणाऱ्या महिलांच्या खात्यावर वर्ग करण्यास प्रारंभ केला असून रक्कम जमा झाल्याचे संदेश मोबाईलवर धडकले आहेत.












