- दहा जणांसह एका पोलिसाचा देखील त्यात समावेश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० एप्रिल २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात एकाच दिवशी तीन जणांना कोरोनाची लग्न झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे या तिघांच्या संपर्कातील हाय रिस्क व्यक्तींना महापालिकेने रुग्णालयात पाठविले आहे.
गुरुवारी पॉझिटीव्ह आढळलेला पुरुष रुग्ण त्रास होत होता, म्हणून चिंचवडमधील महापालिकेच्या दवाखान्यात गेला होता. तिथून त्याला वायसीएम रुग्णालयात हलविण्यात आले. या रुग्णाला दवाखान्यात नेणारे पाच जण आणि त्याच्या जवळील तिघे अशा ‘हाय रिस्क कॉन्टॅक्ट’मध्ये आलेल्या आठजणांना महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात दाखल केले आहे.
तसेच पुण्यातून शहरात आलेली कोरोनाबाधित महिला ही गृहिणी आहे. या महिलेच्या ‘हाय रिस्क कॉन्टॅक्ट’मध्ये आलेल्या एका पोलिसासह दोघांना महापालिका रुग्णालयात तपासणीसाठी दाखल केले आहे. या सर्वांचे घशांचे नमुने पुण्यातील एनआयव्हीकडे पाठविण्यात आले आहेत. त्यामुळे शहरात घबराट पसरली आहे.













![[ब्रेकिंग न्यूज] लाचखोरीच्या आरोपानंतर मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे निलंबित!...](https://newspcmc.com/wp-content/uploads/2026/11/Screenshot_20261104_200149_Google-190x122.jpg)




