न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ एप्रिल २०२०) :- चिखली, जाधववाडीतील जेष्ठ महिला सौ. सिंधुताई विष्णु जाधव यांचे अल्पशा आजाराने आज शनिवारी (दि. ११) रोजी दुःखद निधन झाले. अत्यंत मनमिळावू स्वभावाच्या असल्याने समस्त पंचक्रोशीत त्यांच्या जाण्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
त्या चिखली परिसरातील सामाजिक कार्यकर्ते संतोष जाधव यांच्या मातोश्री तर, स्थानिक नगरसेविका सौ. अश्विनीताई संतोष जाधव यांच्या सासूबाई
होत.
त्यांचा अंत्यविधी कार्यक्रम टाळगाव चिखलीतील इंद्रायणी नदीकाठी आज दुपारी ठीक ३.३० वाजता होणार आहे.