न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ एप्रिल २०२०) :- कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाच्या नियंत्रणास्तव पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात आपत्कालीन उपाययोजना लागू करण्याची व त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना आखण्याची आवश्यकता निर्माण झाल्याने, आज नव्याने शहरातील खालील भाग सील करण्याची आवश्यकता आहे.
– विनियर्ड चर्च परिसर, दापोडी (माता शितळादेवी चौक – विनियर्ड चर्च – सुखवानी ग्लोरी – पब्लिक फुड शेल्टर – धुम स्टार मेन्स पार्लर – पिंपळे गुरव रोड – माता शितळादेवी चौक).
– डायमंड प्लास्टिक कंपनीजवळ कासारवाडी (सिध्दार्थ मोटार कासारवाडी दत्तमंदिर – पिंपळे भारत गॅस – सीएमई बॉन्ड्री- सीएमई बॉन्ड्री – सीएमई बॉन्ड्री – सीएमई बॉन्ड्री. सिध्दार्थ मोटार कासारवाडी).
हा भाग आज शनिवार, दि . ११ एप्रिल, २०२० रोजी रात्री ११. ०० वाजलेपासून पुढील आदेशापर्यंत सील करणेचे आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत. तसेच सदर परिसरातील संबंधित पोलिस स्टेशन प्रमुख यांचे मार्फत सदर भागाच्या हद्दी सील करणे आवश्यक आहे. तसेच सदर परिसरांच्या हद्दींमध्ये पुढील आदेशापर्यंत प्रवेशबंदी व परिसरातून बाहेर पडण्यास नागरिकाना बंदी करणे, सील केलेल्या परिसरातील प्रत्येक नागरिकाने तोंडाला मास्क लावणे बंधनकारक आहे.















