न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ एप्रिल २०२०) :- सांगवी पोलीस ठाण्यातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी लोकांनी घराबाहेर पडू नये हा संदेश देण्यासाठी रूट मार्च काढला. यावेळी ज्या भागातून हा रुट मार्च गेला तिथल्या लोकांनी घरातून पोलिसांना टाळ्या वाजवून प्रोत्साहन दिलं.
ज्या भागात पोलिसांनी घराबाहेर पडणाऱ्यांना काठ्यांचा प्रसाद दिला होता, तिथेच आज रूट मार्चच्या वेळी टाळ्या वाजवून पोलिसांच्या कार्याचं कौतूक करण्यात आलं. तसेच त्यांना आम्ही घरातून बाहेर पडणार नाही याची शाश्वतीही दिली.


















