- कोरोनाच्या तक्रारींमुळे शहर पोलीस हैराण…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ एप्रिल २०२०) :- पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील नियंत्रण कक्षात दिवसाला गुन्हेगारांऐवजी सर्वसामान्य नागरिकांचे ७५ ते ८० फोन येत आहेत. यामध्ये गर्दी केल्याचे सर्वाधिक फोन आहेत.
त्यातच आमचा शेजारी सारखा खोकतोय, अशी तक्रार करणारे फोनही पोलिसांना येत आहेत. त्यामुळे साडे तीन हजार जणांवर गुन्हे दाखल करुनही विनाकारण फिरणाऱ्यांच्या मागे पोलिसांना धावावे लागत आहे. सोमवारी आत्तापर्यंतची एका दिवसातील सर्वात मोठी म्हणजे २२४ जणांवर कारवाई केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
संचारबंदीच्या काळात मोकाट फिरणाऱ्यांवर वाकड पोलिसांनी एकाच दिवशी ५० तर चिखली पोलिसांनी २७ वाहने जप्त केली. त्यानंतर विविध पोलीस ठाण्यांमध्ये आत्तापर्यंत एक हजार ४४९ वाहने जप्त केल्याची नोंद आहे. तर मास्क न वापरणाऱ्यांच्या विरोधात शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये १६७ गुन्हे दाखल केले आहेत.












