न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ एप्रिल २०२०) :- मुंबई पाठोपाठ आता पुण्यातही करोनाबाधितांच्या मृतांचा आकडा वाढतच चालला आहे. आज (बुधवार) आणखी दोन करोनाबाधित रुग्णांचा पुण्यात मृत्यू झाला. या दोघांवर ससून रुग्णालयात उपचार सुरु होते, त्यांना इतर व्याधींनी देखील ग्रासले होते. आजच्या मृत्यूंमुळे पुण्यातील करोनाबाधितांच्या मृतांचा एकूण आकडा ४० वर पोहोचला आहे.
पुण्यात बुधवारी ७३ वर्षीय आणि ३४ वर्षीय दोन पुरुषांचा ससून रूग्णालयात करोनाच्या आजारावर उपचार सुरू असताना मृत्यू झाला. या दोन्ही रुग्णांना इतर आजार देखील होते. यांपैकी ३४ वर्षीय पुरुषाला मधुमेहानं ग्रासलं होतं.
दरम्यान, पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात मंगळवारी ४६ नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे पुणे, पिंपरी-चिंचवड, पुणे छावनी आणि पुणे ग्रामीण परिसरातील रुग्णांची संख्या ३६५ झाली आहे.


















