न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ एप्रिल २०२०) :- तबलिगी जमातचे प्रमुख मौलाना साद यांच्यासह इतर काही जणांवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिल्लीसह संपूर्ण भारतात करोनाचं संकट वाढलं ते तबलिगी जमातच्या निजामुद्दीनमध्ये झालेल्या उत्सवामुळे. यामुळेच दिल्ली पोलिसांनी तबलिगी जमातचे प्रमुख मौलाना मोहम्मद साद यांच्यासह इतर काही जणांवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल केला आहे.
एवढंच नाही तर पोलिसांनी व्हिसाच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या १९०० जणांना लुकआउट नोटीसही जारी केली आहे. आजतकने यासंदर्भातले वृत्त दिले आहे. मौलाना साद यांनीही आपण क्वारंटाइन आहोत असं सांगितलं होतं. आता त्यांचा आयोसोलेशनचा कालावधी संपला की पोलीस त्यांना अटकही करु शकतात.


















