न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ एप्रिल २०२०) :- केंद्र आणि राज्य शासनाच्या धोरणानुसार पिंपरी चिंचवड शहरात आणखी लॉकडाऊन वाढले आहे. त्यामुळे गोरगरीब, मजूर अन्नाशिवाय उपाशी राहू नयेत, यासाठी लॉकडाऊन काळात श्री महेशदादा लांडगे युवा मंचचे अध्यक्ष आणि ‘फ’ प्रभागाचे स्वी. नगरसेवक दिनेश यादव यांनी कुदळवाडी परिसरात काम हाती घेतले आहे. लॉकडाऊन सुरु झाल्यापासून ते जमेल तेवढे धान्य वाटप करत आहेत.
कुदळवाडी भागात परप्रांतीय नागरिक, कामगार वर्ग, बांधकाम मजुर, ट्रान्सपोर्ट कामगार मोठ्या प्रमाणात आहेत. त्यांना काम बंद असल्यामुळे मोठ्या संकटाला समोरे जावे लागत आहे. त्यामुळे आमदार महेशदादांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना होईल तेवढी मदत करण्याचा प्रयत्न मी करीत आहे. त्याचबरोबर काका शेळके, किशोर लोंढे, बालाजी पांचाळ, युवराज ताठे, राहुल कांबळे, दिपक घन हे कार्यकर्ते देखील माझ्याबरोबर परीश्रम घेत आहे, अशी माहिती यादव यांनी दिली.


















