न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ एप्रिल २०२०) :- माजी खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाण्यामधील नेते यांना करोनाची लागण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून ते राज्याच्या गृहनिर्माणमंत्र्यांच्या संपर्कात होते.
राज्याच्या गृहनिर्माणमंत्र्यांचा करोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे, मात्र पूर्वकाळजी म्हणून सध्या ते कुटुंबासोत होम क्वारंटाइन आहेत. त्यांच्या संपर्कातील जवळपास १५ जणांना करोनाची लागण झाली असल्याचं स्पष्ट झालं आहे. यामध्ये पाच पोलीस कर्मचारी, घऱातील कर्मचारी आणि कार्यकर्त्यांचा समावेश आहे. या सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.


















