- शहरातील करोना बाधितांची संख्या ४८ तर, सक्रीय रुग्ण ३५..
- चिंताजनक.. निझामुद्दीन घटनेतील कोरोना रुग्णाची दुसरी टेस्टदेखील पॉझिटिव्ह…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ एप्रिल २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाने धुमाकूळ घातला असून, दररोज तीन ते चार रुग्ण कोरोनाबाधित आढळत आहेत. बुधवारी संशयीत रुग्णांचा रिपोर्ट आला असून, त्यात चार वर्षांची एक मुलगी, २२ आणि २९ वय असलेल्या दोन महिला कोरोना पॉझिटिव्ह आदळल्या आहेत. हे तीनही रुग्ण भोसरी भागातील आहेत. कोरोना बाधित रुग्णांच्या ‘हाय रिस्क कॉन्टॅक्ट’मधील हे तीन रुग्ण आहेत. तसेच भोसरीतीलच आणखी एका पुरुषाला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
चिंताजनक बातमी म्हणजे दिल्लीच्या निझामुद्दीन भागातील तबलिगी जमात मर्कजमधील धार्मिक कार्यक्रमांतून आलेल्या एकाचा १४ दिवसांचा उपचाराचा कालावधी संपल्याने त्याचे सॅंपल कोरोना टेस्टसाठी एनआयव्हीकडे पाठविले होते. त्याचे दोन्हीही रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासनाची चिंता आणखीनच वाढलेली आहे.
शहरातील करोना बाधितांची संख्या ४८ वर पोहचली असून ३१ रुग्णांवर पिंपरी-चिंचवड शहरातील महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. १२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. तर, चार कोरोना बाधित रुग्णांवर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. रविवारी (दि. ९) रोजी एकाचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे.


















