- काळाखडक येथे सिगारेटसह इतर वस्तूंची लुट…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ एप्रिल २०२०) :- काळाखडक येथे जाधव कॉर्नर जवळ साई पान शॉप ही पान टपरी आहे. पाच चोरट्यांनी मिळून बुधवारी पहाटे दीडच्या सुमारास पान टपरीचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. टपरी मधून कॉटन स्वब बिडी बंडल, कोलगेट मेंटॉस नॅचरल इटली कोकनेट कॅन्डी गोळ्याच्या तीन बरण्या आणि रोख रक्कम असा एकूण एक हजार ९२० रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे.
ही घटना बुधवारी (दि. १५) पहाटे दीडच्या सुमारास काळाखडक वाकड येथे घडली. रमेश मलाप्पा येगरे (वय ३३, रा. काळाखडक झोपडपट्टी, वाकड) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. त्याच्यासह राहुल चव्हाण आणि अन्य तीन साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस नाईक अमित किसन खेडकर यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी यातील एका चोरट्याला अटक केली आहे.


















