न्यूज पीसीएमसी नेटवर्क
- आरोपीची सासु गंगुबाई बबन शिंदे (वय ८२) यांचा शिवाजीनगर, देहूरोड येथे राहत्या घरी आजारपणा आणि वृद्धापकाळाने मृत्यू झाला. त्यानंतर त्यांचा अंत्यविधी करण्यासाठी नियमानुसार डॉक्टरांचे प्रमाणपत्र घेऊन कॅन्टोन्मेंट बोर्ड देहूरोड यांच्याकडून स्मशान दाखला मिळवून रीतसर अंत्यविधी करणे अपेक्षित होते.
मात्र शिंदे यांनी वॉर्डातील एका नगरसेवकाचा मुलगा आणि अन्य काही जणांच्या मदतीने सासूचा अंत्यविधी केला. दरम्यान स्मशानभूमीतील वॉचमनने मयताचा स्मशान दाखला न पाहता त्यांना स्मशानभूमीत प्रवेश दिला. मृत्यू झालेल्या महिलेच्या मृत्यूचे कारण माहिती न करता मृतदेहाची विल्हेवाट लावली. ही घटना रविवारी (दि. १२) शिवाजीनगर, देहूरोड येथे घडली.
शोभा शंकर शिंदे (वय ४०, रा. शिवाजीनगर, देहूरोड), पंकज गोपाळराव तंतरपाळे, रेव सोलोमोनराज भंडारे, राजू मारीमुत्तू, गोविंद मंचल आणि स्मशानभूमीतील तीन वॉचमन अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी मोहम्मद रफी अल्लाउद्दीन सय्यद (वय ५४, रा. संत तुकारामनगर, पिंपरी) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.












