न्यूज पीसीएमसी नेटवर्क
वाकड :- सासरच्यांनी एका विवाहित महिलेस माहेरहून पाच लाख रुपये घेऊन ये म्हणून मानसिक छळ व चारित्र्याच्या संशयावरुन मारहाण, शिवीगाळ, शिळं अन्न खायला देणं आणि जिवंत जाळण्याची धमकी दिल्याप्रकरणी विवाहित महिलेने त्यांच्याविरुद्ध वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.
परंतु तक्रारदार महिलेच्या सासऱ्यांचे सहा महिन्यांपूर्वी निधन झाले असूनही पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा प्रताप केला आहे. मयत सासऱ्यांचा मुलगा आणि तक्रारदार महिला यांचा २८ मे २०१५ साली विवाह झाला होता. सहा महिने संसार अगदी आनंदात सुरु होता पण नंतर व्यवसाय टाकण्याचं ठरलं. यासाठी तक्रारदार महिलेला माहेरहून पाच लाख घेऊन यायला सांगितलं.
दरम्यान सासऱ्यांचे २७ जून २०१८ रोजी निधन झाले आहे. तरीही वाकड पोलिसांनी पती, सासू आणि मयत सासऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचा प्रताप केला आहे. पोलिसांना यासंबंधी विचारलं असता निधन होण्यापूर्वी सासऱ्यांनी त्रास दिला होता, म्हणून गुन्हा दाखल केल्याचं म्हटलं आहे. पण आता त्यांची चौकशी कशी करणार याचं उत्तर मात्र त्यांच्याकडे नाही.










