- सुखद घटना … आज आणखी एक रुग्ण करोनामुक्त…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ एप्रिल २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाच अतिक्रमण थांबण्यास तयार नाही. रोज नवे रुग्ण वाढत आहेत. महापालिकेने सकाळी ११ ते सायंकाळी ७. ३० या दरम्यान एनआयव्हीकडे पाठविलेल्या रुग्णांचे अहवाला आज रात्री प्राप्त झाले आहेत.
या अहवालात तब्बल सात जणांना कोरोनाची लागण झाली आहे. या सात जणांमध्ये दोन पुरुष आणि पाच महिलांचा समावेश आहे. पुरुषांची वये अनुक्रमे ३२ आणि ७७ वर्षे असून महिलांचे वय अनुक्रमे १२,१७,१८,४०,४० अशी आहेत. हे रुग्ण पिंपरी, खराळवाडी आणि काळेवाडी फाटा परिसरात वास्तव्यास आहेत.
तसेच आज सोमवारी खराळवाडी परिसरातील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात दाखल असलेल्या एका रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजवर एकूण २९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरातील करोना बाधितांची एकूण संख्या ९६ वर गेली आहे. महापालिकेच्या रुग्णालयात उपचारासाठी ५५ रुग्ण दाखल आहेत.


















