- रुग्णांच्या लक्षणातदेखील आणखी वाढ…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ एप्रिल २०२०) :- करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्याता आलेला लॉकडाउनचा कालावधी संपत आलेला असला तरी अद्यापही नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं नाही. भारतात गेल्या २४ तासात ७३ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून मोठी वाढ झाल्याचं पहायला मिळत आहे. सोबतच १८९७ नवे रुग्ण सापडले आहेत. भारतात सध्या करोनाबाधित रुग्णांची संख्या ३१ हजार ३३२ झाली आहे. तर मृतांची संख्या १००७ झाली आहे. आतापर्यंत ७६९५ जणांना उपचार करुन घरी सोडण्यात आलं आहे.
देशात करोनाचे सर्वात जास्त रुग्ण महाराष्ट्रात आहेत. मंगळवारी महाराष्ट्रात एका दिवसात ७२९ नवे रुग्ण सापडले. यानंतर महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांची एकूण संख्या ९ हजार ३१८ झाली आहे.
केवळ मुंबईत करोनाग्रस्तांचा आकडा ५ हजार ९८२ वर पोहोचला आहे. मंगळवारी मुंबईत करोनाचे ३९३ नवे रुग्ण सापडले. तर मुंबईतील धारावी परिसरात ४२ नवे रुग्ण समोर आले आहेत. दरम्यान, १०६ रुग्णांवर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आल्याची माहितीही आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
तसेच रुग्णांमध्ये थंडी वाजून येणे, थंडी वाजून अंग शहारणे, स्नायूदुखी, डोकेदुखी घसा धरणे, चव व वास संवेदना तात्पुरती जाणे, अशी सहा नवी लक्षणे आढळली आहेत.













