- दरम्यान नागरिकांनी टॉवेल-श्रीफळ देऊन पोलिसांचा केला सन्मान…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २. मे. २०२०) :- सांगवी पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी आणि अधिकारी यांनी पिंपळे गुरव परिसरात आज रूट मार्च काढला. यावेळी नागरिकांनी उत्स्फूर्तपणे पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना टॉवेल-श्रीफळ देऊन सन्मानित केलं.
तसेच टाळ्या, शंखनाद, पुष्पवृष्टी करून त्यांचं मनोबल वाढवलं. ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम’, ‘महाराष्ट्र पोलिस दलाचा विजय असो’ असा जयघोषही यावेळी करण्यात आला. नागरिकांनी बाहेर पडू नये म्हणून आज रूट मार्चचं आयोजन करण्यात आलं होतं.


















