- रमजानसाठी सगळीकडेच रस्ते भरले; मग आमच्याप्रती शासन आणि पोलिसांचा दुजाभाव का? – राज ठाकरे…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३ मे. २०२०) :- राज्यातील लॉकडाउनच्या अंमलबजावणीसंदर्भात शासन आणि पोलिसांकडून होत असलेल्या दुजाभावाबद्दल मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली.
“सुरूवातीच्या काळातील उपाययोजना सोडल्या, तरी सध्या भासवल्या जाणारी स्थिती दिसत नाही. ज्या पद्धतीनं काम व्हायला हवं होतं, ते दिसत नाही. म्हणजे रमजानसाठी सगळीकडे रस्ते भरले आणि आम्ही रस्त्यावर आलो की बांबू खावे लागणार, असं कसं चालेल,” अशा शब्दात राज ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली.
एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना ते म्हणाले की, ज्यावेळी अश्या प्रकारे संकट येतं त्यावेळी कोणत्याही प्रकारचा धर्म असता कामा नये. त्यावेळी सगळ्यांना समान न्याय आणि वागणूक असली पाहिजे. सगळ्यांना सगळ्यांचा धर्म आहेच की? आम्हाला नाही का आमचा धर्म? आमचे सण आणि उत्सव आम्ही घरामध्ये साजरे केले. अगदी १४ तारखेची आंबेडकर जयंती माझ्या दलित बांधवांनी घरामध्ये साजरी केली. सगळ्या धर्माची लोक आपापले सण उत्सव घरामध्ये साजरे करतायेत मग अशा ठराविक लोकांसाठी अशा गोष्टी का होतायेत? असा सवाल राज यांनी यावेळी उपस्थित केला.


















