न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ४ मे. २०२०) :- कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व संसर्ग लक्षात घेता बाहेरगावी जाण्याकरिता नागरिकांनी आरोग्यविषयक तपासणी करुन निरोगी असल्याचे प्रमाणपत्र घेणे शासनाने बंधनकारक केले आहे. त्यादृष्टीने पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये वास्तव्यास असणा-या परंतु महाराष्ट्रातील इतर ठिकाणी तसेच परराज्यात जावू इच्छिणा-या नागरिकांसाठी आरोग्यविषयक तपासणी करण्याची सुविधा महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये उपलब्ध करण्यात आलेली आहे.
वैद्यकिय तपासणी करिता नागरिकांनी गर्दी न करता मास्कचा वापर व सोशल डिस्टन्सिंगचे शिस्तीने पालन करुन रुग्णालयीन प्रशासनास सहकार्य करावे. तसेच सदर वैद्यकिय सुविधेचा लाभ महानगरपालिकेच्या नजीकच्या रुग्णालयामध्ये जाऊन घेण्याचे आवाहन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी केले.
महानगरपालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयाच्या परीसरात खालील दवाखाने तपासणीसाठी उपलब्ध आहेत :-
- अ क्षेत्रीय कार्यालय : आकुर्डी रुग्णालय, संभाजीनगर येथील साई अंब्रेला डिस्पेंसरी, दत्तनगर दवाखाना चिंचवड, इ . एस . आय . हॉस्पीटल मोहननगर, भाटनगर दवाखाना भाटनगर पिंपरी , चिंचवड स्टेशन दवाखाना एमआयडीसी ऑफीस समोर चिंचवड.
- ब क्षेत्रीय कार्यालय : काळेवाडी दवाखाना, पोलीस चौकीसमोर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले रुग्णालय ( नविन तालेरा रुग्णालय ) चिंचवड , प्रेमलोक पार्क दवाखाना – दळवीनगर , बिजलीनगर दवाखाना , वाल्हेकरवाडी दवाखाना , किवळे दवाखाना – मनपा शाळेजवळ.
- क क्षेत्रीय कार्यालय : नेहरूनगर दवाखाना – मनपा गोडाउन जवळ, खराळवाडी दवाखाना – बालभवन इमारत.
- ड क्षेत्रीय कार्यालयः पिंपळे गुरव दवाखाना – मनपा शाळेजवळ पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर दवाखाना, पुनावळे दवाखाना, पिंपळे निलख दवाखाना – औध औंध कॅम्प पुणे.
- इ क्षेत्रीय कार्यालयः भोसरी रुग्णालय, मोशी दवाखाना, च-होली दवाखाना, दिघी दवाखाना, बोपखेल दवाखाना, नवीन भोसरी रुग्णालय – अंकुशराव लांडगे नाट्यगृहासमोर भोसरी.
- फ क्षेत्रीय कार्यालयः घरकुल दवाखाना, यमुनानगर रुग्णालय, तळवडे दवाखाना, प्राधिकरण दवाखाना – सिंधुनगर निगडी. म्हेत्रेवस्ती दवाखाना.
- ग क्षेत्रीय कार्यालय : जिजामाता दखावाना – जुन्या डिलक्स टॉकीजवळ पिंपरी, पिंपरी वाघेरे दवाखाना – पिंपरीगाव, थेरगाव रुग्णालय- थेरगाव.
- ह क्षेत्रीय कार्यालय : वायसीएम रुग्णालय – संत तुकाराम नगर, सांगवी रुग्णालय – जूनी सांगवी, कासारवाडी दवाखाना, दापोडी दवाखाना, फुगेवाडी दवाखाना, जिल्हा रुग्णालय पुणे – औध रोड सांगवी.
या ठिकाणीही फ्लु कलीनीक सुरु करण्यात आले आहेत. या ठिकाणीही नागरीकांना आपली तपासणी करुन प्रमाणपत्र प्राप्त करून घेता येईल. या शिवाय खाजगी रुग्णालयात तपासणी करून प्रमाणपत्र प्राप्त करून घेता येणार आहे. येथील प्रमाणपत्रही पर राज्यात व पर जिल्ह्यात जाण्यासाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे.


















