- प्राधिकरण नागरी कृती समितीच्या कार्यकर्त्यांकडून वंचितांना जीवनावश्यक वस्तूंची मदत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ मे. २०२०) :- शहरात लॉकडाऊन च्या तिसऱ्या टप्प्याने ५० दिवस पूर्ण केले आहेत. कोरोना विषाणूच्या प्रादूर्भावाने पिंपरी चिंचवड शहरात बाधितांनी दिडशेचा आकडाही आज पार केलेला आहे. ४ जनांचा दुर्दैवाने बळीही गेला आहे. अश्या परस्थितीतीत २८ लाख लोकसंख्या असणाऱ्या शहराची धडधड शांत झाली असून, नागरिकही भीतीच्या सवटातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करीत आहेत. या भीषण शांततेत रोजंदारी करणाऱ्या हजारो कुटुंबावर मात्र बेरोजगारीची कुऱ्हाड पडली आहे. दिव्यांग आणि वंचित कुटुंबाची तर आर्थिक परस्थिती खुपच खालवली आहे. अनेक कुटुंबाना अजून स्थानिक प्रशासनाने कोणतीही आर्थिक मदत दिलेली नाही. प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी त्यामुळे पुढाकार घेऊन अश्या कुटुंबाना अन्नधान्य, व जीवनावश्यक वस्तूंच्या संचाची थेट मदत दिली. याकरिता शहरातील प्रत्येक प्रभागात सुरक्षा समितीच्या वतीने वंचितांना घरपोच संचाचे वाटप करण्यात आले.
यासाठी शहर समन्वयक अर्चना घाळी, देवयानी पाटील, प्रभागवार विभागप्रमुख व संच वाटप समवयस्क म्हणून चरण आकटे, विजय मुनोत, सतीश देशमुख, लक्ष्मण इंगवले, धीरज बोरा, सुनिल पाटील, कमलेश ओस्तवाल, प्रकाश हिरावट, मनोज ढाके, बाबासाहेब घाळी, संतोष चव्हाण, अमित डांगे, हरी जारवाल, रवी हेळवर यांनी काम पाहिले.
या उपक्रमास विशेष सहकार्य संभाजीनगर स्थित उद्योजक ब्रजेशकुमार चौबे, शशी पिल्ले तसेच राजेश हजारे,राजेंद्र येळवंडे,नंदकुमार इंगळे,अमर कुंभार,प्रकाश पानस्कर,राजाराम सावंत,सुरेश गावडे,सुनिल वाघ,संजय कांबळे,वृषाल देवकर,संजय लोखंडे,संतोष रांजणे,संदीप पोलकम,संतोष पोलकम,उद्धव कुंभार,डायमंड सोशल अँक्टिव्हिटी ग्रुपचे संतोष छाजेड,अशोक नहार,राजेंद्र कटारिया,विजय नहार,मुनोत भाईपा पिंपरी चिंचवड ग्रुप चे राजेंद्र मुनोत,अनुप मुनोत,उदय गार्डन सोसायटी चे अभिजीत देशपांडे,जयकुमार गुजर,रुपाली मिश्रा,श्रीदेवी वीर राजु यांनी केले.
या उपक्रमा संदर्भात समितीचे राज्य संपर्क प्रमुख विजय मुनोत म्हणाले,” लॉक डाऊन चा मोठा अवधी लोटूनही प्रशासन अजूनही वंचितांसाठी ढीम्मच आहे. दिव्यांग कुटुंबियांची आर्थिक स्थिती खूपच दयनीय झाल्याने त्यांना तातडीने आर्थिक मदत देण्याचे काम स्थानिक पालिका प्रशासनाने करणे अत्यावशक आहे”.
साईराज कॉलनीतील सामाजिक कार्यकर्ते धीरज बोरा म्हणाले,” आपल्या उद्योगनगरीतील अनेक छोट्या उद्योगांना लॉकडाउन चा फटका बसला आहे.त्यामुळे अनेक कामगारांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे.त्याच हेतूने प्राधिकरण सुरक्षा समितीच्या उपक्रमामध्ये आम्ही सहभागी झालो.त्यामुळे निदान काही कालावधी करीता त्यांचे कुटुंब भुकेपासून नक्कीच वंचित राहील. अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूच्या संच मुळे त्यांना हातभार मिळाला आहे.”
संभाजीनगर चिखली – चिंचवड परिसरातील आदर्श कामगार पुरस्कारप्राप्त सामाजिक कार्यकर्ते सतीश देशमुख म्हणाले,” परिसरातील काही उद्योजक व टाटा कंपनीचे कामगार यांच्या वतीने आर्थिक निधी उभारून जीवनावश्यक वस्तू व धान्य यांचे वाटप प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीच्या माध्यमाने शहरात गरजू व वंचित कुटुंबाना करण्यात आले”.
प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे अध्यक्ष विजय पाटील म्हणाले,” संपूर्ण महाराष्ट्रात लॉकडाउनचा तिसरा टप्पा सुरू आहे, ५० दिवसानंतर अजूनही राज्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे. शहराची आर्थिक घडी, त्यामुळे पूर्णपणे विस्कटलेली आहे. अनेक कुटुंबावर उपासमारीची वेळ सुरू झाली आहे. प्रशासनाची मदत अनेक कुटुंबापर्यंत अद्याप पोहचलेली नाही. त्यामुळे शहरातील सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या व्यक्तींच्या सहकार्याने दिव्यांग व वंचित कुटुंबाना जीवनावश्यक वस्तू व धान्य याची घरपोच मदत करण्यात आली.


















